सराईत गुन्हेगार टिपू पठाण टोळीतील गुंड शाहरुख उर्फ हट्टी रहीम शेख हा पुणे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला. शाहरुख हा काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये फरार होता. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर त्याने गोळीबार केला आणि त्यानंतर चकमक उडाली. ही घटना रविवारी पहाटे पाचच्या सुमारास मोहोळजवळ लांबोटी येथे घडली. दरम्यान, पोलिसांनी घरात घुसून मारल्याचा आरोपीच्या पत्नीने केला आहे.