पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यात पूल कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तसेच घटनास्थळी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनासह पोलीस आणि एनडीआरएफची टीम बचावकार्य करत आहेत. तसेच या घटनेत ३८ जणांचा जीव वाचवण्यात यश आल्याची माहिती सांगण्यात आली आहे. दरम्यान, ही घटना नेमकं कशामुळे घडली? या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी दिली आहे.