सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा आणि वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील यांनी काँग्रेसचे तीन माजी महापौर, दोन माजी उपमहापौर आणि आठ माजी नगरसेवक यांच्यासह बुधवारी भाजपात पक्षप्रवेश केला. यावेळी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. सांगलीत आता कोणाचा
करेक्ट कार्यक्रम होणार असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारला. त्यावर फडणवीसांनी सूचक विधान केलं आहे.