शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भरत गोगावले यांनी त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेळी महायुतीतील सहकारी पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे मंत्री भरत गोगावले पुन्हा एकदा अघोरी पूजेमुळे चर्चेत आले आहेत.