दोन्ही शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा मेळावा गुरुवारी मुंबईत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी अभिनेते नाना पाटेकर यांच्या एका चित्रपटातील कम ऑन किल मी हा डायलाॅग म्हणत शिंदे गटाला आव्हान दिलं. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मेळाव्यात प्रत्युत्तर दिलं आहे. मरे हुए को क्या मारना? महाराष्ट्रातील जनतेनं विधानसभेत तुमचा मुडदा पाडलेलाच आहे, अशी टीका शिंदेंनी केली.