मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांध्ये तिसरी भाषा म्हणून सर्वसाधारणपणे हिंदी किंवा काही अटींसह अन्य भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करून देणारे शुद्धिपत्रक शालेय शिक्षण विभागाने १७ जून रोजी प्रसिद्ध केले. यामुळे राज्यात हिंदी पहिलीपासून अप्रत्यक्षपणे सक्तीनेच शिकवली जाणार असल्याचे दिसून येत आहे. या निर्णयावर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना, शिक्षण विभागाने आता निर्णयाच्या अंमलबजावणीचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं वेळापत्रक जारी केलं आहे.