Flight Fighting Viral Video : अहमदाबाद विमान अपघातानंतर लोक विमान प्रवास करण्यास घाबरत आहेत, या अपघातानंतर तांत्रिक बिघाडामुळे देशासह जगभरातून विमान उड्डाणं रद्द होत असल्याच्या बातम्या येत आहेत. यातच सोशल मीडियावर विमानांशी संबंधित अनेक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहेत. यात एक असाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय ज्यात एक महिला प्रवासी दोन पुरुष प्रवाशांसह भांडताना दिसतेय. यात धक्कादायक बाब म्हणजे महिलेला तिचा मुलगा शांत करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती त्यालाही सर्वांसमोर धोपटायला सुरुवात करते. याच व्हिडिओचं फॅक्ट चेक आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.