Bala Nandgaonkar: गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.तसेच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली, त्यामुळे मनसे आणि भाजपा युती करणार का? असा प्रश्न उपस्थित केला गेला. तसेच शिंदे गटातील मंत्री उदय सामंत यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे आता मनसे कोणाबरोबर युती करणार? हा प्रश्न अनेकांना पडला. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर बाळा नांदगावकर यांनी दिलं आहे.