Thane Traffic: मेट्रो उड्डाणपूल, नव्या इमारती बांधून ठाणे बदलतय अशा गप्पा एकीकडे मारल्या जात असताना सायंकाळच्यावेळेत गावदेवी परिसरातून घरी परतण्यासाठी रिक्षांचा शोध घेणाऱ्या प्रवाशांचा बुधवारी रात्री झालेला उद्रेक ठाण्यातील राजकीय तसेच प्रशासकीय व्यवस्थेच्या डोळ्यांत अंजण घालणारा ठरला आहे. अशातच आता गाड्यांच्या टोईंग विरुद्ध ठाणेकर एकवटले असून त्यांनी प्रशासनाला सवाल केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाडांनी ठाणेकरांच्या प्रश्नाला उत्तर द्या असं म्हणत हा व्हिडीओ शेअर केलाय.