Pahalgam Terrorist Attack Two Locals Arrested: पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या दोघांना एनआयएने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांनी दहशतवाद्यांना आश्रय देत रसद पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. परवेझ अहमद जोथर आणि बशीर अहमद जोथर अशी या दोघांची ओळख पटली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एनआयएने कारवाई करत दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाप्रकरणी दोन जणांना अटक केल्याचं एका निवेदनात एनआयएने म्हटल्याचं वृत्तात म्हटलं आहे.