Actor Tushar Ghadigaonkar Suicide: मराठी एकांकिका, नाटक, मालिका आणि चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता तुषार घाडीगावकर याने मानसिक तणावातून शुक्रवार, २० जून रोजी आत्महत्या केली. तो ३४ वर्षांचा होता. तुषारच्या पार्थिवावर शनिवारी दुपारी भांडुप स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मित्रमंडळी व कलाकार उपस्थित होते. त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान तुषारच्या मृत्यूनंतर त्याने कामाच्या अभावी हे पाऊल उचललं अशी चर्चा सुरु होती मात्र यावर आक्षेप घेत त्याच्या काही कलाकार मित्रांनी वेगळीच बाजू मांडली आहे.