शिवसेना हायजॅक करण्याचा प्रस्ताव संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंकेड मांडला होता. मात्र हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. त्यावेळी सर्वात आधी फुटणारे संजय राऊत होते, असा गौप्यस्फोट मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यावर खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. गुलाबराव पाटलांच्या खात्यात कुठूनतरी ४० ते ५० कोटी रुपये जमा झाले होते. ईडी किंवा सीबीआय अटक करू शकते. या भीतीने गुलाबराव गेले, असा खुलासा राऊतांनी केला.