Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव द्यावं, अशी मागणी भाजपाच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. तसंच रेल्वे स्थानकाचं नुतनीकरण करताना परिसरात पुण्याचा इतिहास दिसेल याची काळजी घ्यावी, असं त्या म्हणाल्या. मेधा कुलकर्णी यांच्या या मागणीवर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया देत पुन्हा एकदा पुणे शहरात पेशवाईचा संदेश देणं कितपत संयुक्तिक आहे, याचा विचार करावां असं म्हटलं आहे.