BJP MP Medha Kulkarni On Pune Railway Station : “पुणे रेल्वेस्थानकाचं नामांतर करावं”, अशी मागणी भाजपाच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. त्या म्हणाल्या, “पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव द्यावं. तसेच या रेल्वेस्थानकाचं नुतनीकरण करताना परिसरात पुण्याचा इतिहास दिसेल याची काळजी घ्यावी”. यावर शिवसेनेच्या नेत्याने रेखा कोंडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून तुमच्या घराचे नाव बदलून पेशवे सदन असे करून घ्या असा सल्ला दिला आहे.