मुंबईच्या विधानभवनात दोन दिवसीय अंदाज समितीची परिषद पार पडली. यावेळी समितीचे अध्यक्ष अर्जून खोतकर यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप आहेत, त्यावरून संजय राऊतांनी टीका केली. धुळ्यात खोतकरांच्या पीएच्या रूममध्ये कथित कोट्यवधींचं घबाड सापडलं. असे आरोप असलेला अंदाज समितीचा अध्यक्ष त्या बैठकीत मिरवत होता हा महाराष्ट्राला आणि फडणवीसांच्या कारकिर्दीला कलंक आहे, अशी टीका राऊतांनी केली.