Kalyan Drug Addict Attempts Suicide, Chaos In Kalyan: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या सॅटिसच्या कामावर चढून नशेत असलेल्या एका गर्दुल्ल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने पोलिस, कामगार व नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या पार्श्वभूमीवर समाजसेविका राणी कपोते यांनी पोलिसांना इशारा दिला आहे की, जर अशा नशेखोरांवर कठोर कारवाई करून आळा घालण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. स्थानक परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर इशारा मानला जात असून लवकरच प्रशासनाकडून योग्य पावले उचलली जातील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.