Mumbai 1 card।मेट्रो आणि रेल्वेपाठोपाठ आता ‘मुंबई १’ कार्डवर मिळणार एसटीचं तिकीट
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे तिकीट काढण्यासाठी आता मुंबई वन कार्डचाही वापर करता येणार आहे. एसटी महामंडळाच्या तिकिट प्रणालीचे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसोबत एकात्मीकरण करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतुकीसाठी ‘मुंबई १’ हे एकल कार्ड लवकरच सुरू होणार असून, आता एसटीही त्यात सहभागी होणार आहे.