Latur Traffic Police Women Constable Viral Video: वाहतूक पोलिसांकडून अरेरावी होत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात काही नागरिक पोलिसांच्या वागण्यावर नाराजी व्यक्त करतात. तर काही व्हिडीओमध्ये पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असल्याचं दिसत आहे, तर काही ठिकाणी नागरिक पोलिसांशी वाद घालताना दिसत आहेत. लातूर शहरात सुद्धा दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्या तीन तरुणींना चोप दिल्याचा एका महिला वाहतूक पोलीस कॉन्स्टेबलचा व्हिडीओ व्हायरल होत होता. त्याच महिला वाहतूक पोलीसांचा एक अन्य वादाचा व्हिडीओ सुद्धा आता समोर आलेला आहे. यात नेमकं काय घडलंय पाहूया..