सातासमुद्रापारच्या एका फॅशन शोमध्ये Prada नावाच्या एका जगविख्यात कंपनीवर कोल्हापुरी चप्पलचा ब्रँड चोरीचा आरोप होतोय. कोल्हापुरी चप्पल आपल्याकडे ८०० ते १००० पर्यंत मिळते. मात्र धक्कादायक म्हणजे त्याच कोल्हापुरी चप्पलची हुबेहूब कॉपी करून Prada ही इटलीची कंपनी जगभरात आपली कोल्हापुरी चप्पल १ लाख ५ हजारांना विकत असल्याचेही दावे होत आहेत. अशातच Prada कंपनीने एक फॅशन शो आयोजित केला होता. त्याच वेळी एकाहून अधिकांनी कोल्हापुरी चप्पलेच्या ब्रँडिंगसाठी वापर केल्याचे पाहायला मिळाले.