Manisha Kayande: पंढरपूरची वारी जगभरात प्रसिद्ध आहे.या वारीसाठी लाखो वारकरी पंढरीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो दिंड्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत,सर्वसामान्य कार्यकर्ते भाविक वारीत जात असतात. मात्र, असं असताना काही अर्बन नक्षलवादी वारीत शिरले आहेत, ही ऐकीव माहिती नसून सबळ पुरावे समोर आले आहेत, असे शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी म्हलं आहे.