अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिशाची हत्या नसून आत्महत्याच असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दरम्यान, दिशाच्या वडिलांनी सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.