Mira – Bhainder Marathi Controversy, Avinash Jadhav Vs Nitesh Rane: मिरा रोड येथे मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकानदाराला मनसे पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना नुकताच घडली होती. या प्रकरणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आता यावरून भाजप व मनसेच्या नेत्यांमध्ये वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळतेय. अविनाश जाधव यांनी एकीकडे भाजपच्या नेत्यांनीच हा मोर्चा काढल्याचे म्हणत आरोप केले आहेत. तर दुसरीकडे भाजप नेते नितेश राणे यांनी मनसैनिकांना आव्हान दिलं आहे.