Uddhav Thackeray Remark on Raj Thackeray at Victory Rally : मराठी जनतेचा संताप, पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेनेने (ठाकरे) आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्य सरकारने नमतं घेत दोन्ही शासन निर्णय रद्द केले. त्यामुळे आंदोलनाच्या दिवशी दोन्ही पक्षांनी विजयी मेळावा घेण्याचं ठरवलं आणि आज (५ जुलै) मुंबईतील वरळी येथे विजयी मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर युतीचे संकेत दिले आहेत.