शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा मराठीसाठीचा विजयी मेळावा शनिवारी पार पडला. या मेळाव्यावरून महायुतीतील नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं आहे. सत्ताधाऱ्यांच्या या टीकेला आता खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महायुतीतल नेते गोंधळले आहेत. त्यांचं डोकं चालेनास झालं
आहे.