वरळी येथे पार पडलेल्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर भाजपा नेत्यांकडून सडकून टीका केली जात आहे. त्यावर आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. म मराठीचा नसून महापालिकेचा आहे, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली. दोघांचा हेतू केवळ राजकीय असल्याचं आमदार तथा मंत्री आशिष शेलार म्हणाले. त्यावर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी भाजपामधील इनकमिंगबद्दल बोलताना तुमचा स सत्तेचा नसतो? असा उलट सवाल केला आहे.