शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांनी विधानसभेत आपल्या नंदूरबार जिल्ह्यातील तेलाच्या भेसळीचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आमश्या पाडवींचा मंत्री असा उल्लेख केला. त्यावेळी इतर सदस्यांनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतरही झिरवाळ यांनी दुसऱ्यांदा आमदारांचा मंत्री उल्लेख केल्याने ते गोंधळलेले पाहायला मिळाले.