पंढरपूरच्या वारीदरम्यान एका कमांडोकडून महिलेसह एका कॅमेरामनला सुद्धा मारहाण झाल्याचा आरोप करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रथमदर्शनी हा व्हिडीओ वाखरी येथील असल्याचे समजतेय, यात मागे वाखरी इथे पार पडणारे उभे रिंगण दिसत आहे. पोलिस प्रशासन आणि वारी व्यवस्थापन समितीने अशा प्रकारांवर लक्ष ठेवावे, जेणेकरून वारीची शुद्धता आणि भक्तीभाव कायम राहील, अशी मागणी करत सागर सोनावणे या तरुणाने हा व्हिडीओ शेअर केला आहे.