मुंबईत पुन्हा एकदा भाषिक वादाचा मुद्दा तापला आहे. या पार्श्वभूमीवर अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा-भाईंदर शहरात आज मनसेच्यावतीने मोर्चा काढला जाणार आहे. मात्र तत्पूर्वी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना सध्या काशिमीरा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे.