मीरा भाईंदरमध्ये आज होणाऱ्या मनसेच्या मोर्च्याआधी मनसे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यावरून आता मनसेने नेते संदीप देशपांडे आक्रमक झाले आहेत. गुजराती माणसाच्या मोर्च्याला परवानगी देतात. मग मराठी माणसाच्या मोर्च्याला का आडवतात? असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.










