आज (८ जुलै) मनसेच्यावतीने मीरा-भाईंदर शहरात मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्यात येत आहे. मात्र, मनसेच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मनसेच्या मिरा भाईंदरमधील मोर्चाला परवानगी का देण्यात आली नाही? याचं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पण फडणवीसांनी कारण सांगताच संदीप देशपांडे संतापले.