MNS Mira- Bhayandar Protest: मिरा-भाईंदरमध्ये ८ जुलै रोजी निघणाऱ्या मराठी भाषिक नागरिकांच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती मात्र आज सकाळपासूनच होणारा विरोध पाहता आता अखेरीस या मोर्चाला परवानगी देण्यात आली आहे. या मोर्चामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र मोर्चेकरी ठाम असून त्यांनी मोर्चासाठीची तयारी सुरू ठेवली होती. दरम्यान स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी सुद्धा पोलिसांच्या भूमिकेला अनुमोदन दिले होते पण दुसरीकडे महायुतीचे नेते व मंत्री प्रताप सरनाईक यांनी मी स्वतः मोर्च्याला जाणार आहे, पोलिसांनी हिमंत असेल तर मला अटक करून दाखवावी असं आव्हान दिले होते.