विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा चर्चेत न घेतल्याने विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच आंदोलन केलं. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, नितेश राणे, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची एन्ट्री झाल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजीतून त्यांना डिवचलं.