Avinash Jadhav: मिरा भाईंदरमध्ये आज (८ जुलै ) निघणाऱ्या मराठी भाषिक मोर्चापूर्वीच, मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी मनसे नेते अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले होते, मात्र तरीसुद्धा हजारोंच्या संख्येत मनसैनिक तसेच उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते सुद्धा मिरा भाईंदर परिसरात जमले होते. अखेरीस या मोर्चाला परवानगी प्राप्त झाल्यावर अविनाश जाधव यांची सुटका झाली. आता मोर्चामध्ये अविनाश जाधव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.