मनसेच्यावतीने मीरा-भाईंदर येथे मंगळवारी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. अमराठी व्यापाऱ्यांच्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारत मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली होती. दिवसभर सुरू असलेल्या मोर्चाच्या चर्चेनंतर आता राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत कार्यकर्ते आणि प्रवक्त्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.