महाराष्ट्रात सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू आहे. दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयानं एक मोठा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेतल्या पत्रांना आता मराठी भाषेतूनच उत्तर दिलं जाणार आहे, असा हा निर्णय घेण्यात आला आहे. संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.