आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवास कँटिनमधील निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर आज संजय गायकवाड यांनी विधानभवनात तेच शिळं अन्न आणून माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी टीका करणाऱ्या खासदार संजय राऊतांना देखील टोला लगावला.