Mill Workers Protest In Mumbai: गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर एकजूट झालेल्या मुंबईसह महाराष्ट्रातील १४ कामगार संघटनांच्या “गिरणी कामगार संयुक्त लढा समिती”च्या वतीने आज ९ जुलै सकाळी आझाद मैदानात जाहीर सभा पार पडली. आधी भायखळा-राणीबाग ते विधानभवन पर्यंत कामगारांचा धडक “लाँगमार्च’ आयोजित करण्यात आला होता.परंतु पोलिसांनी याला परवानगी नाकारल्यामुळे,आता आझाद मैदानावर ही सभा पार पडेल,अशी माहिती गिरणी कामगार लढा समितीचे प्रमुख आमदार सचिन अहिर यांनी येथे दिली.या मोर्च्याला शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित आहेत.













