Sanjay Gaikwad: मुंबईमधील आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळे अन्न दिल्यामुळे शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. या मारहाणीचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत. त्यानंतर संजय गायकवाड यांच्यावर अनेकांनी टीका केली. आता या प्रकरणावर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.