आमदार निवासच्या कँटिनमधील मारहाण प्रकरणावरून खासदार संजय राऊतांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली होती. यावेळी संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली. ज्याला मारहाण केली तो शेट्टी होता. मराठी मराठी करता मग आता शेट्टीचा पुळका का? असा प्रश्नही गायकवाड यांनी केला.