Avinash Jadhav Kasheli Tunnel Video: मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आपल्या फेसबुकवरील पोस्टमधून आता आणखी एक नवा विषय उचलून धरला आहे. कोकणात जात असताना भरपावसात कशेळी येथे असलेल्या भोगद्याची परिस्थिती दर्शवणारा व्हिडीओ अविनाश जाधव यांनी पोस्ट केलाय. इगतपुरी भागात प्रवास करत असताना तिथे असलेल्या सुविधांची तुलना कोकणातील भोगद्यांशी करून हजारो कोटी खर्च करूनही कोकणकरांच्या जीवाशी खेळ का होतोय असा सवाल जाधव यांनी उपस्थित केलाय.