Air India Plane Crash Ahmedabad Fuel Control Switches : गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला होता. तपास यंत्रणांकडून या अपघाताचा प्राथामिक अहवाल नागरी उड्डाण मंत्रालयाकडे सादर करण्यात आला आहे.गुजरातहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात १२ जून रोजी झाला होता. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर हे विमान केवळ ३२ सेकंदांतच एका निवासी इमारतीवर कोसळलं. या दुर्घटनेत विमानातील २६२ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला, ज्यामध्ये १० केबिन क्रू सदस्यांचा समावेश होता. विशेष बाब म्हणजे विमानाच्या ११ अ क्रमांकाच्या सीटवर बसलेला एक प्रवासी अपघातातून चमत्कारिकरीत्या बचावला. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे झाला आणि तपास यंत्रणांनी अहवालात नेमकं काय नमूद केलं? त्याबाबत जाणून घेऊ…