Praveen Gaikwad Controversy : संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला आहे. शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं आहे. तसेच त्यांच्या डोक्यावर काळी शाई टाकून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरोधकांनी आता या हल्ल्यावर टीका केली आहे. दरम्यान हल्ल्यानंतर स्वतः प्रवीण गायकवाड यांनी हा आपल्या हत्येचा कट होता अशी शक्यता व्यक्त केली आहे.