जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे रविवारी एका कार्यक्रमात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला. या प्रसंगी त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या गोरगरीब मराठा समाज बांधवांचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा. मात्र त्यांनी कुठलीही दखल अद्याप घेतलेली नाही. त्यामुळे येत्या २९ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या संख्येनं समाजाला सोबत घेऊन, मी मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहे. आता मी मुंबईवरून आरक्षण घेऊन येणार किंवा येणार, असा इशाराही जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.