Rohit Pawar: संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर रविवारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणावर रोहित पवार यांनी आज प्रतिक्रिया दिली. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा रोहित पवार यांनी निषेध व्यक्त केला. तसेच यावेळी रोहित पवार यांनी दीपक काटे नावाच्या भाजपाच्या कार्यकर्त्यावर आरोप देखील केले आहे.



















