प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल या वादा नंतर पहिल्यांदाच प्राडा कंपनीचं शिष्टमंडळ मंगळवारी कोल्हापुरात दाखल झालं. कोल्हापुरी चप्पल बनवल्या जाणाऱ्या भागांमध्ये भेट देत या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी कोल्हापुरी चप्पल नेमकी बनते कशी? त्यासाठी कारागीर कसं काम करतात? त्यांच्या समस्या नेमक्या कोणत्या आहेत? या सर्व बाबींबाबत चर्चा केली. यावेळी या शिष्टमंडळाच्या सदस्यांचं स्वागत करताना व्यावसायिकांनी कोल्हापुरी चप्पल भेट म्हणून दिली. तसंच या शिष्टमंडळाच्या सदस्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कोल्हापुरी चपलेचं आणि हस्तकलेचं कौतुकही केले.