नालासोपाऱ्यात वाहन चालकाला वाहतूक परवाना विचारल्याने त्याने वडिलांना बोलावून वाहतूक पोलिसांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. या मारहाणीचा व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे. याप्रकरणी तीन जणांना तुळींज पोलीसांनी अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.