विजयी मेळाव्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबतच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. त्यानंतर नुकतंच पार पडलेल्या मनसेच्या शिबिरात राज ठाकरेंनी युतीबाबत भाष्य केल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावर आता राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे.