राज्यातील काही माजी मंत्र्यासह अधिकारी हनी ट्रॅपच्या प्रकरणात अडकल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणावर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी बुधवारी विधानसभेत भाष्य केलं होतं. त्यानंतर आजही हा विषय काढत याची चौकशी करावी, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली. यावेळी एकच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.