MNS Worker assault shopkeeper: मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांना आदेश देत असताना कुणालाही मारहाण करताना व्हिडीओ काढू नका, असे सांगितले होते. मात्र विरारच्या घटनेनंतर आता विक्रोळीतही एका दुकानदाराला मनसे कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून मारहाण केली आहे. सदर दुकानदाराने व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी ही मारहाण करण्यात आली असून दुकानदाराची बाजारातून धिंडही काढण्यात आली.