Eknath Shinde: मी केवळ अर्ध्या दाढीवरून हात फिरवला तर, आडवे झाले, त्यातून अजून सावरले नाहीत.आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे उठेगा नहीं, हे बोलणे त्यांना शोभत नाही, असा टोला लगावत पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता तर काय झाले असते, याचा विचार त्यांनी करावा, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे (शिंदे) प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केलं होतं. या वक्तव्यासह त्यांनी नामोल्लेख टाळत उद्धव ठाकरेंना टोला लगावला होता. या वक्तव्यावर आता उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.